वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
दक्षिण आफ्रिकेचा फुटबॉलपटू कोल ऍलेक्झांडर याच्याबरोबर ओडिशा एफसी फुटबॉल क्लबने नुकताच नवा करार केला आहे. आगामी होणाऱया सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेवेळी ऍलेक्झांडर ओडिशा एफसी संघाकडून खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू ऍलेक्झांडर बरोबर ओदिशा एफसी संघाने दोन वर्षांचा करार केला आहे. 31 वर्षीय ऍलेक्झांडरने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व यापूर्वी केले होते.









