वृत्तसंस्था/ रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या विश्व टेनिस स्पर्धेत कॅनडाचा फेलिक्स ऍलीयासिमेने रशियाच्या रूबलेव्हचा उपांत्य सामन्यात पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता ऍलीयासिमे आणि ग्रीकचा सित्सिपस यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात तृतीय मानांकित ऍलीयासिमेने रशियाच्या माजी विजेता आंद्रे रूबलेव्हचा 6-7 (5-7), 6-4, 6-2 असा पराभव केला. एपीटीच्या मानांकनात रूबलेव्ह सध्या सातव्या तर ऍलीयासिमे नवव्या स्थानावर आहेत. या स्पर्धेतील दुसऱया सामन्यात ग्रीकच्या चौथ्या मानांकित सित्सिपसने झेकच्या लिहेकाचा 4-6, 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.