ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेची सूचना : दोन आरोग्य कर्मचाऱयांवर लसीची रिऍक्शन
जगातील पहिली मान्यताप्राप्त कोरोनाची लस देण्यास प्रारंभ करणारा ब्रिटन मंगळवारी जगातील पहिला देश ठरला होता. परंतु याच्या 24 तासांतच काही समस्या समोर आल्या आहेत. तेथे लसीचा डोस घेतलेले दोन आरोग्यकर्मचारी आजारी पडले आहेत. दोन्ही आरोग्य कर्मचाऱयांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत.
दोघांनाही लसीची रिऍक्शन झाल्याचे समजते. तसेच दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ही दोन प्रकरणे समोर आल्यावर ब्रिटनच्या हेल्थकेयर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजेन्सीने (एमएचआरए) मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार एखाद्या खाद्यपदार्थाची किंवा औषधाची गंभीर ऍलर्जी असलेल्या लोकांनी या लसीचा डोस घेऊ नये. इतरांना मात्र या लसीपासून कुठलीच अडचण नसल्याचे म्हटले गेले आहे.
ब्रिटनमध्ये ऍलर्जीच्या समस्येमुळे किती लोकांना फायजरची लस घेण्यापासून रोखण्यात येणार हे अद्याप स्पष्ट नाही. एका अनुमानानुसार ब्रिटनमध्ये 70 लाख लोकांना गंभीर ऍलर्जी असून त्यांना याकरता तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करवून घ्याव लागत आहेत. कुठल्याही नव्या लसीमुळे ऍलर्जीची काही प्रकरणे समोर येणे सामान्य बाब असल्याचे ब्रिटनच्या
प्रतिदिन 5-7 हजार जणांना लस

दोन जणांना फायजरच्या लसीमुळे ऍलर्जी होऊनही ब्रिटनचे सरकार प्रतिदिन 5 हजार ते 7 हजार लोकांना लस देत आहे. फायजर कोरोना लसीचे 8 लाखांहून अधिक डोस ब्रिटनमधील रुग्णालयांमध्ये पोहोचविण्यात आले आहेत. कोविड-19 ‘बीएनटी162बी2’ लसीमुळे दोन जणांमध्ये ऍलर्जी झाल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणी फायजर आणि बायोएनटेक चौकशीत एमएचआरएला मदत करत असल्याचे फायजरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
लस घेतल्यावर मद्यपान नको

स्पुतनिक-5 लस टोचून घेतल्यावर दोन महिने मद्यपान करू नका, असा सल्ला रशियाच्या अधिकाऱयांनी नागरिकांना दिला आहे. लस घेतल्यावर किमान 42 दिवसांपर्यंत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तरच ही लस प्रभावी ठरणार आहे. याचमुळे दोन महिन्यांपर्यंत मद्यपान टाळा, असा सल्ला रशियाच्या नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच मास्क परिधान करणे सुरूच ठेवा, असे उद्गार रशियाचे उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा यांनी काढले आहेत.
चिनी लस 86 टक्के प्रभावी

चिनी लस 86 टक्के प्रभावी असल्याचे उद्गार संयुक्त अरब अमिरातने काढले आहेत. ही लसही पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित लसीशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे. या लसीची निर्मिती सायनोफार्म कंपनीने केली आहे. ही लस गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे करण्यास 100 टक्के प्रभावी असून याचा दुष्परिणाम होत नसल्याचा दावा आहे.
लॉजिस्टिक, कोल्डचेन मोठे आव्हान
भारतासह जगाच्या विविध हिस्स्यांमध्ये लसीचे वितरण मोठे आव्हान आहे. लॉजिस्टिक आणि कोल्डचेनची कमतरता मोठी अडचण ठरू शकते, असे उद्गार भारतात कोवॅक्सीन विकसित करणारी कंपनी भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी काढले आहेत. पहिले आव्हान युनिसेफपर्यंत लस सुरक्षित आणि शास्त्राrय पद्धतीने पोहोचविण्याचे आहे. हैदराबाद किंवा मुंबईतून युनिसेफपर्यंत कोल्डचेनमध्ये लस पाठविणे पहिले यश ठरणार आहे. त्यानंतर युनिसेफकडून अन्य देशांपर्यंत लसीचे वितरण सुनिश्चित करणे दुसरे मोठे आव्हान असल्याचे एल्ला यांनी म्हटले आहे.









