मुंबई
ऍम्पीयरची नवी इलेक्ट्रीक स्कुटर मॅग्नस प्रो गाडी सोमवारी बाजारात दाखल झाली. या गाडीच्या विक्रीचा शुभारंभ झाला असून किंमत 73 हजार 990 (एक्स शोरुम) इतकी असणार आहे. मॅग्नस प्रो ही नवी गाडी 75 ते 80 कि. मी. इतके एका चार्जवर मायलेज देणार आहे. सध्या ही गाडी बेंगळूरमध्ये उपलब्ध असून लवकरच इतर शहरात ती विक्रीस उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. अँटी थेफ्ट अलार्म, डिजीटल एलसीडी क्लस्टर, मोबाईल चार्जिंग पॉईंट, एलइडी लाइट्स अशा सुविधा गाडीत असतील. ही गाडी कंपनीच्या वेबसाईटवर ग्राहकांना बुक करता येईल.









