वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन दिवसांपूर्वी फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्यातील झालेल्या व्यवहारामुळे अन्य कंपन्यांना धास्ती लागून राहिली आहे. कारण ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट तसेच गुगल ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करत आहेत. फेसबुक आणि जिओच्या एकत्र येण्याने आपापला व्यवसाय वाचविण्याची मोठी चढाओढ येत्या काळात त्यांच्यामध्ये राहणार आहे.
या व्यवहाराने अंबांनीच्या नेतृत्त्वातील रिलायन्स ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर उतरणार आहे. त्यामुळे ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या तुलनेत रिलायन्स सरस ठरण्याचे संकेत आहेत. येत्या 2028 पर्यंत देशातील ऑनलाईन व्यवसाय 200 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचे संकेत आहेत. ई नेटवर्कमुळे रिलायन्स जिओमार्ट, जिओ मोबाईल ग्राहक, जिओ टीव्ही, डिजिटल शिक्षण व किरकोळ व्यापाऱयांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने देशातील ऑनलाईन बाजारात येत्या काळात मोठय़ा प्रमाणात दबदबा निर्माण करण्याची रणनीती फेसबुक आणि जिओची असणार आहे.
वेगळा विचार शक्मय
आगामी काळात या स्पर्धेत टिकण्यासाठी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट कोणती रणनीती आखणार आहे, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या लहान क्यापाऱयांना सोबत घेऊन अन्य मार्गाचा वापर करुन आपले स्थान येत्या काळात बळकट करण्यावर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगल विचार करण्याचा अंदाज केला जात आहे.









