नवी दिल्ली :
ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस पुढील आठवडय़ात भारत दौऱयावर येणार आहेत. लहान आणि मध्यम उद्योगांसाठी तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेझॉस सहभाग घेणार आहेत. हा कार्यक्रम येत्या 15 आणि 16 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यामध्ये केंद्र सरकाचे अधिकारी, देशातील उद्योगपत्तीसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभाग घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. या विशेष कार्यक्रमात व्यापारी संघटनाही बेझॉस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील नवीन नियत व लहान आणि मध्यम उद्योगातील समस्यांसह अन्य एफडीआय पॉलिसीचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी म्हटले आहे. तर या अगोदर उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ई-कॉमर्स कंपन्यांची चर्चा केली आहे.








