वृत्तसंस्था /बेंगळूर :
ऍमेझॉन डॉट इन यावर 100 पेक्षा अधिक लघु आणि मध्यम उद्योग (एसएमबी) तसेच स्टार्टअप कंपन्या चालू वर्षातील ऑगस्टच्या सहा आणि सात तारखेला प्राईम डे दिवशी 17 विविध प्रकारची 1000 पेक्षा अधिक नवी उत्पादने सादर करणार असल्याची माहिती आहे.
ऍमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार प्रथमच प्राईम डे दिवशी हजारो स्थानिक दुकानांमध्ये प्रथमच आपली उत्पादने सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये ऍमेझॉन लाँचपॅड कार्यक्रमाअंतर्गत स्टार्टअप कंपन्या आणि लघु आणि मध्यम उद्योग आपली विशिष्ट उत्पादने आणणार आहेत. सदर उत्पादनांमध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि व्यक्तिगत संरक्षण, सौदर्य, किराणा आणि घरातील उत्पादनांचा समावेश राहणार असल्याचे स्पष्ट केले असून सोबत प्राईम डेवर कारागिर आणि महिला उद्योजिकांचीही उत्पादने सादर होण्याचे संकेत आहेत.








