प्राथमिक रचनेसाठी बेजोस यांची नारायण मुतांसोबत चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस भारतात अन्न पुरवठा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऍमेझॉन स्विगी आणि झोमॅटो यांच्यासोबत टक्कर देण्याची मोर्चे बांधणी करत आहेत.
यासाठी कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस बेंगळूरमध्ये लवकरच पायलट प्रोजेक्ट सुरु करत जात आहेत. परंतु डिलीव्हरी व्यवसायाला रेस्टॉरन्टला जोडण्यासाठी ऍमेझॉनकडून इन्फोसिसचे सहसंस्थापक एन नारायण मुर्ती यांची मदत घेणार आहे.
दोन तासात सेवा
ऍमेझॉन अन्न पुरवठा सेवा दोन तासात ग्राहकांना देण्यासाठी पुरवठा साखळीची उभारणी करत त्याची मदत घेणार आहे. यासाठी ऍमेझॉनने मोठी गुंतवणूक केलेली आहे. या कामगिरीत सर्वात मोठी टक्कर ही देशातील अगोदरपासून कार्यरत असणाऱया अन्न पुरवठा क्षेत्रातील कंपन्या स्विगी आणि झोमॅटो यांना द्यावी लागणार आहे. अशी माहिती इकॉनॉमिक्स टाईम्सच्या एका अहवालातून देण्यात आली आहे. मोठय़ा विचारांसोबत ही रचना करण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये ऍमेझॉन ग्रॉसरी, इलेक्ट्रॉनिक्सपासून देशातील उत्पादनांशी संबंधीत असणारे व्यवसाय करत असून यांच्या आधारेच सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी देणार असल्याचेही कंपनीचे संकेत आहेत.









