नवी दिल्ली
थेट विक्रीच्या कार्यक्षेत्रात असणारी एफएमसीजी कंपनी ऍमवे इंडिया आपल्या व्यवसायाचा विस्तार भारतभर करण्यासाठी 100 कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते. पुढील 2 वर्षाच्या काळात ही रक्कम विविध कारणांसाठी गुंतवली जाणार आहे. कंपनीच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी गुंतवणूकीचे योगदान महत्त्वाचे ठरणारे असणार आहे. भविष्यात 1 हजार कोटी गुंतवण्याचा मानस कंपनीचा असून तामिळनाडूत निलाकोटाईत कारखान्यासाठी 600 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.