वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मानवाधिकार संस्था ऍमनेस्टी इंटरनॅशनल यांनी भारतामधील आपले काम थांबविले आहे. सदरचे काम थांबवत असताना त्यांनी केंद्र सरकारविरोधी भावनेने काम करत असल्याचाही आरोप केला आहे. त्यांची बँक खाती पूर्णपणे गोठवली आहेत. याचा प्रभाव म्हणून भारतामधील काम थांबविण्यास खतपाणी घातल्याचेही म्हटले आहे.
या संस्थेने असाही दावा केला आहे, की दिल्लीमध्ये फेबुवारीत झालेल्या दिल्ली पोलीस दंगलीसह अन्य जम्मू काश्मीरसह अन्य प्रश्नांची विचारणा सरकारकडे केली होती. यामुळेच संस्थेच्या वित्तीय संदर्भातील व्यवहारांवर लक्ष पेंद्रीत केल्याचाही आरोप यावेळी केला आहे. सरकारने सदरची बँक खाती 10 सप्टेंबर रोजी गोठवली असल्याची माहिती प्राप्त झाल्याचाही उल्लेख केला आहे.









