चार वर्षात टप्पा पार करण्याचा अंदाज : एव्हरकोर फर्मकडून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक सर्व्हिसेस आणि व्हेयरेबल व्यवसायाच्या जोरावर अमेरिकेतील टेक कंपनी ऍपल लवकरच दोन लाख कोटी डॉलर्सचे बाजारमूल्य असणारी जगातील पहिली कंपनी होणार असल्याचा अंदाज आहे. हा अंदाज मार्केट रिसर्च फर्म एव्हरकोर आयएसआयच्या अहवालामधून व्यक्त करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीच्या आधारे आगामी चार वर्षात ही उंची ऍपल पार करण्याचे संकेत आहेत. ऍपल ही अमेरिकेतील पहिली कंपनी आहे की जिने 2018 रोजी 1 लाख कोटी डॉलर्सचा बाजारमूल्याचा आकडा पार केला आहे. एअरपॉड्स आणि ऍपल वॉच यांच्या विस्तार योजनेच्या जोरावर येत्या चार वर्षात आपला व्यवसाय वाढवत 60 अब्ज डॉलर्सपर्यंत घेऊन जाण्याची शक्मयता ऍपलने व्यक्त केली आहे.
बाजारातील संशोधकांच्या माहितीनुसार ऍपल कंपनीच्या समभागात 1 अब्जाने कपात होण्याची शक्मयता आहे. यामध्ये ऍपलने आर्थिक वर्ष 2019 रोजी 4.6 अब्जच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये समभागांची संख्या कमी करत 3.6 अब्ज करण्याचा प्रयत्न होणार आहे, असेही माहितीतून समोर आले आहे. या प्रवासापर्यंत ऍपलच्या समभागांची किंमत 550 प्रति डॉलर होणार असून ज्यायोगे कंपनीला 2 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा पार करण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्व्हिस क्षेत्राचा नवीन ट्रेंड
मागणी आणि पुरवठा यांच्यातील अस्थिर वातावरणामुळे आयफोनची विक्री घटत आहे. यामुळेच सर्व्हिस सेगमेंटसाठी ऍपल आपला नवीन टेंड स्थापन करण्याचा विचार करत आहे. यासाठी ऍपलने मार्च तिमाहीत ऍपल सर्व्हिसेस क्षेत्रात वर्षांच्या आधारे 17 टक्क्मयांनी वाढ केली आहे. यामध्ये ऍप स्टोर, ऍपल म्युझिक, ऍपल व्हीडीओ, ऍपल क्लाउड सेवा, ऍपल केअर, ऍपल टीव्ही प्लस आणि ऍपल आर्केड आदींची भर घालत विस्तार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









