नवी दिल्ली
ऍपलने अंतिमतः आपले ऍपल वॉच सीरीज 7 हे भारतात सादर केले आहे. कंपनीने या सीरीजला आयफोन 13 सीरीजसोबत लाँच केले होते. परंतु भारतीय बाजारात याच्या लाँचिंगचा खुलासा केलेला नव्हता. सध्या या वॉचला भारतीय ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. कंपनीचे महाग व सर्वात प्रीमियम वॉच म्हणून याची ओळख राहणार आहे.
8 ऑक्टोबरपासून विक्री
सदरच्या वॉचची विक्री 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे. तर दुसरीकडे ऑफलाईन स्वरुपात हे वॉच 15 ऑक्टोबरपासून खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीची किमत ही 41,900 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.









