जीएसटी दर वाढल्यामुळे मोबाईल उद्योगावर 15 हजार कोटीचे ओझे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपल, रियलमी, वीवो-शाओमी या स्मार्टफोनच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये रियलमी, वीवो-शाओमी यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किमती वाढविल्या आहेत. तर बुधवारी ऍपलनेही आपल्या स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे. परंतु यामध्ये शाओमीने आपल्या स्मार्टफोनच्या किमतीत किमी वाढ केली आहे. त्याचा खुलासा केला नसून जेएसटी दर 50 टक्क्मयांनी वाढवून 12 ते 18 टक्के केली आहे.
11 मार्च रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 39 व्या जीएसटी बैठकीत मोबाईल फोनवर आकारण्यात येणारा जीएसटी दर 12 टक्क्यांवरुन 18 टक्के केला आहे. परंतु हा वाढीव जीएसटी दर 1 एप्रिल 2020 पासून देशभरात लागू करण्यात आला आहे.
मोबाईल कंपन्यां अडचणीत
वाढत्या कोरोनाच्या प्रसारणामुळे जगातील मोबाईल कंपन्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सध्याच्या उद्योगधंद्यावर मोठा प्रभाव पडणार आहे. तसेच आर्थिक मंदीच्या छायेसोबत कोरोनाचाही फटका मोबाईल उद्योगाला बसणार आहे. यामध्येच मोबाईलवर आकारण्यात येणारा जीएसटी दर 12 वरुन 18 टक्के झाल्यास मोबाईल उद्योगावर जवळपास 15 हजार कोटी रुपयाचे ओझे पडणार असल्याचे अनुमान असून याचा फटका 100 कोटी भारतीय ग्राहकांना बसणार असल्याचे इंडस्ट्रीज बॉडी इंडिया सेलुलर असोसिएशन (आयसीइए) यांच्याकडून सांगण्यात आले आहे.









