सॅन फ्रान्सिस्को
ऍपल कंपनी आपली नवीन उत्पादने सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये आज 8 सप्टेंबर रोजी आयपॅड आणि बहुप्रतिक्षीत ऍपल वॉच आवृती 6 यांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. कंपनी सदरची उपकरणे मंगळवारी सादर करणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.कंपनी आगामी वॉच मॉडेल 6 सादर करणार असून यामध्ये क्राउनमध्ये बिल्ट इन टच आयडी फिंगरप्रिंट सेंसरसोबत सादर होण्याचे संकेत आहेत. परंतु टच आयडी फिंगरप्रिंट सेंसर कसे लागू करण्यात येणार आहे याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. तसेच सदर मॉडेलमध्ये इसीजी कॅप्चर करण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे.









