नवी दिल्ली
ऍपल या टेक कंपनीकडून स्वतःचे सरप्राइज इवेंट वन मोर थिंग याची तयारी सुरु करण्यात आली आहे. सदरचा कार्यक्रम हा 10 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे कंपनी यात कॉम्प्युटर चीप असणारी मॅक उत्पादने सादर करणार असल्याची माहिती आहे. जी उत्पादने कंपनीची होममेड प्रोसेसरमधील पहिला लॅपटॉप सादर करणार आहे.
ऍपलचा हा व्हर्चुअल इव्हेंट ऍपल पार्कमधून कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटवर aज्ज्त.म्दस् पाहता येणार असल्याचेही म्हटले आहे. कंपनीने ऍपल लोगोसोबत कलरफुल बँकग्राउंडचाही वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या होममेड प्रोसेसरमधून मॅक कॉम्प्युटरमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.








