भारतासह अन्य देशात होणार उपलब्ध
नवी दिल्ली ः ऍपल कंपनीचा 20 एप्रिल रोजी रात्री खूप उशिराने स्प्रिंग लोडेड इव्हेंट हा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात 5 जी कनेक्टिव्हीटी असणारा आयपॅड सादर केला आहे. सदर आयपॅडमध्ये ऍपल एम 1 प्रोसेसर दिला आहे. कंपनीने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार आपल्या जुन्या आवृत्तीच्या आयपॅडच्या तुलनेत याचा प्रोसेसर हा 75 टक्क्यांनी अधिक वेगवान असल्याचेही म्हटले आहे.
आयपॅड प्रो हा सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगातील मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध होणार असून यामध्ये 128 जीबी, 256जीबी 512 जीबी, 1 टीबी आणि 2टीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मॉडेलचे प्री बुकिंग हे 30 एप्रिलपासून भारतासह अन्य 31 देशांमध्ये सुरु होणार आहे. तसेच 15 मे नंतर याची डिलिव्हरी सुरु होणार असल्याचीही माहिती दिली आहे.
आयपॅड प्रो मधील फिचर्स
आयपॅड प्रोला 11 इंच आणि 12.9 इंच अशा दोन स्क्रीन आकारात सादर केले आहे. यामध्ये 12.9 इंच मॉडेलमध्ये लिक्विड रेटीना एक्सडीआर मिनी एलइडी डिस्प्ले मिळणार आहे. सदर मॉडेल हे विविध आकारातील राहणार आहेत. स्प्रिंग लोडेड इव्हेंटमध्ये ऍपल कंपनीने 5 जी कनेक्टिव्हीटी असणारे आयपॅड सादर केले असून याची भारतामधील सुरुवातीची किमत ही 71,900 रुपयावर राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.









