वृत्त संस्था/ बार्सिलोना
बार्सिलोना फुटबॉल क्लबचा प्रमुख स्ट्रायकर सर्जिओ ऍग्युरोला फुटबॉल क्षेत्रापासून किमान तीन महिने दूर रहावे लागणार आहे. मध्यंतरी ऍग्युरोला छातीत वेदना जाणवल्या. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
गेल्या शनिवारी बार्सिलोना-अल्वेस यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. या सामन्यात खेळताना ऍग्युरोला छातीमध्ये वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिल्याने तो आता तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फुटबॉल क्षेत्रामधून अलिप्त राहणार आहे. बार्सिलोना संघ प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात 11 सामन्यांतून 16 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.









