नवी दिल्ली
ऍक्सिस बँकेला मार्चला संपलेल्या तिमाहीत 2 हजार 677 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. खासगी क्षेत्रातील या बँकेने मागच्या वर्षी समान कालावधीत 1 हजार 387 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. अलीकडे संपलेल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 20 हजार 213 कोटी रुपयांवर पोहचले होते. मागच्या वर्षी ते 20 हजार 219 कोटी रुपये इतके होते. सदरच्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढून 7 हजार 555 कोटी रुपये इतके झाले आहे. जे मागच्या वर्षी 6 हजार 808 कोटी रुपये इतके होते.









