क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
नंदिनीनगर, अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे दि. 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ऋतुजा गुरव हिने 42 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
ती यंदा दहावीत शिकत असून हर हर महादेव तालीम, धुळे येथे सराव करत आहे. ती कुस्ती कोच संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला वडील संतोष गुरव, विनायक गुरव, सुरज गुरव व स्वप्नील मेलगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









