वृत्तसंस्था/ पुणे
शनिवारी येथे झालेल्या 25000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले आणि ब्रिटनची इमेली स्मिथ या टॉप सीडेड जोडीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुजा भोसले आणि ब्रिटनची इमेली स्मिथ यांनी भारताची रिया भाटिया आणि रूमानियाची मिरियम बियान्का बल्गेरू यांचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. ऋतुजा आणि इमेली या विजेत्या जोडीला प्रत्येकी 1437 डॉलर्सचे बक्षीस आणि 50 डब्ल्यूटीए गुण मिळाले. हा अंतिम सामना तीन तास चालला होता.









