प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झळकणार
अभिनेत्री ऋचा चड्ढा आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करत आहे. ऋचाने यापूर्वी इंडो-फ्रेंच प्रॉडक्शन ‘मसान’ आणि ‘लव्ह सोनिया’ चित्रपटावरून मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. ऋचाचा नवा चित्रपट ‘आइना’ची पार्श्वभूमी लंडन आणि भारताशी संबंधित आहे. हा इंडो-ब्रिट चित्रपट ऋचाच्या कारकिर्दितील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. यात ती ब्रिटिश अभिनेता विलियम मोस्लेसोबत मुख्य भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्कस मीड्ट यांनी केले असून यात युद्धामुळे पडणारा प्रभाव दर्शविण्यात आला आहे. जगातील एका नव्या हिस्स्यात काम करण्यासाठी उत्साही आहे. मला प्रयोग करणे आवडते. एका महत्त्वपूर्ण विषयाशी संबंधित चित्रपट सुरू करण्यासाठी हा वास्तवात एक सहकार्यात्मक प्रयत्न ठरणार असल्याचे ऋचाने म्हटले आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण 2 जूनपासून लंडनमध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटात विलियम मोस्ले मुख्य भूमिकेत आहेत. मोस्लेने यापूर्वी ‘द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया’मध्ये बाल कलाकार म्हणून काम करत मोठी प्रसिद्धी मिळविली होती. ‘मार्गारिटा विथ द स्ट्रॉ’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती. आइना चित्रपटाची निर्मिती बिग कॅट फिल्म्स युकेकडून केली जात आहे. ऋचा लवकरच झी स्डुडिओच्या ’नर्स मनजोत’ चित्रपटात दिसून येणार आहे.









