चापगाव / वार्ताहर
तालुक्मयात एकीकडे सूगीचा हंगाम दुसरीकडे वीट हंगामाची लगबग सुरु आहेत. त्यातच ऊस तोडणीलाही वेग आहे. तालुक्मयाच्या नदीकाठ प्रदेशात उसाचे उत्पादन बऱयाच प्रमाणात आहे, यावषी अतिवृष्टीमूळे ओलावा झाल्याने ऊस पिकांना तुरा आला आहे. परिणामी वजनात कमालीची घट होत चित्र दिसून येत आहे. यामूळे शेतकऱयातून ऊस तोडणीसाठी धावपळ सूरु आहे. परंतु सखल भागातील जमिनीत ओलावा असल्याने ऊस तोडणीला अडथळा आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱयांची पंचायत झाली आहे. परिणामी सखल भागातील ऊस तोडणीला जमिनीत विलंब झाला आहे.
दरवषी मर्यादित पावसाळा असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच ऊस तोडणीला जोर येतो परंतु यावषी जमिनीत पूरक ओलावा असल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने रुतत असल्याने कसरत करून वाहने काढावी लागत आहेत. तालुक्मयात सात ते आठ लाख टन उसाचे उत्पादन होते. यावषी मोठय़ा पावसामुळे उसाची वाढ बऱयाच प्रमाणात कमी झाली आहे. मलप्रभा नदी काठ प्रदेशात यावषी उत्पादन बऱयाच प्रमाणात असले तरी ऊस वजन कमी होत असल्याने शेतकऱयांना यावषी ऊस उत्पादनाचा फटका बसणार आहे.
तालुक्मयाच्या नागुर्डा, मोदेकोप, निलावडे या भागात जिह्यातील अनेक कारखान्यांनी उसाची उचल मोठय़ा प्रमाणात सुरु ठेवल्याने या भागातील ऊस तोडणी संपत आला आहे. पण तालुक्मयाच्या पूर्व, नदी काठाच्या पट्टय़ात तसेच पूर्व भागात उसाचे उत्पादन बऱयापैकी आहे. त्यामुळे शेतकऱयांची ऊस तोडणीकडे आता लगबग झाली आहे.
खानापूर लैला शुगर्स साखर कारखान्याच्या तसेच मलप्रभा साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या उसाच्या उत्पादनात यावषी वाढ झाली आहे. दोन्ही कारखान्याकडून तोडणीला प्राधान्य देण्यात येत असले तरी अपुऱया टोळय़ामुळे कारखान्यांना ऊस येणे कठीण झाले आहे. एकीकडे अपेक्षित दराचा घोळ तर दुसरीकडे वेळीच बिले मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अधिकाधिक दर देणाऱया कारखान्याला ऊस पाठवण्याचा विचार करत आहेत.
जिल्हय़ातील साखर कारखान्यानी लैला शुगर्स तसेच राणी शुगर्स कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या उचलीला मोठय़ा प्रमाणात प्राधान्य दिल्याने लैला शुगर्सला तसेच राणी शुगर्सला गाळपाचे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. लैला शुगर्स साखर कारखान्यानी यावर्षी 3 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ ठेवले आहे. पण कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाची मोठय़ा प्रमाणात अन्य कारखान्याना उचल होत असल्याने हे उद्दीष्ट पूर्ण करणे बरेच कठीण जाणार आहे.
जिल्हय़ातील अन्य कारखान्यानी ऊस उचलीला प्राधान्य दिल्याने तालुक्यातून दररोज हजारो टन ऊस बाहेर जात आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लैला शुगर्स कारखान्याला गाळपाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी जास्त काळ कारखाना चालणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यात दरवर्षी सात ते आठ लाख टन ऊस उत्पादनाची सरासरी आहे. पण यावर्षी तालुक्यातील ऊस उत्पादनातही मोठी घट झाली आहे. यावर्षी सरासरी 30 ते 40 टक्के ऊस उत्पादनात घट झाली आहे. पुरक पाण्यामूळे उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी 4 लाख टनपेक्षा अधिक उसाचे उत्पादन होणे कठीण आहे. त्यामुळे शेतकरी वर्गानाही या कमी उत्पादनाचा चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. कारखान्याकडून मिळणारा दर तसेच उत्पादनासाठी येणारा खर्च पाहता शेतकरी वर्गाला यावर्षीचा उसाचा दरही किमान 3500 रु. मिळावा, अशी मागणी आहे. पण बेळगाव विभागातील बऱयाच साखर कारखान्यानी अध्य़ाप पुरक दर जाहीर केला नाही. यावर्षी उसाचा उताराही कमी दिसून येत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत उसाचा उतारा सरासरी साडेनऊ इतका आहे. पुढील दोन महिन्यात उतारा उंचावण्याची शक्यता असली तरी जिल्हय़ातील कारखान्यांच्या ऊस उचलीच्या चढाओढीत जानेवारी अखेरपर्यंत तालुक्यातील संपूर्ण ऊस संपण्याची शक्यता आहे.









