पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातर्फे कमी पर्जन्यमान व पावसाच्या असमतोल असणाऱया क्षेत्रात अनुकूल असे उसाचे नवे वाण विकसित केले आहे. काö9057 हे नवे वाण आता सीमाभागातही फायदेशीर ठरणार आहे.
सीमाभागातील पर्जन्यमान कमी तसेच उसाला असलेल्या प्रतिकुल परिस्थितीत को-9057 हे वाण योग्य होणार आहे. यापूर्वी कोल्हापूर जिह्यासह बेळगाव जिल्हातील निपाणी भाग तसेच सीमाभागात 86032, 265 व 92005 हे वाण जास्त लोकप्रिय आहे. मात्र बदलते वातावरण आणि घटलेले पर्जन्यमान यामुळे उसाच्या पानावर रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. अशा परिस्थितीत पाडेगाव केंद्रातर्फे विकसित केलेल्या नवीन वाणांची लागवड फायदेशीर ठरणार आहे. या केंद्राने विकसित केलेल्या वाणामध्ये को 410, को 740, को 7219, को 7125, को 7527, को 86032, को 265, को 94द12, को 88121 यांचा समावेश आहे. यापैकी को 86032 या वाणाची लागवड सीमाभागात मोठय़ा प्रमाणावर केली जाते. मात्र बदलत्या वातावरणात उत्पादनात घट होत असल्याने को 9057 हे वाण ऊस उत्पादकांना तारणारे आहे. नवे वाण कमी पाण्यावरील चांगले तग धरून राहते. अती पावसात व धुके असतानाही उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही.
ए ग्रेड गुळाची निर्मिती
को 9057 या पासून ए ग्रेड दर्जाच्या गुळाची निर्मिती व चांगले अर्थकारण देणारे आहे. खास करून सेंद्रिय गुळाच्या निर्मितीसाठी या उसाला भविष्यात मोठी किंमत येवू शकते.
सध्या ए ग्रेड
दर्जाच्या गुळासाठी 92005 हे वाण सर्वोत्तम मानले जाते, असे मत ऊसतज्ञ डॉ.
भरत रासकर यांनी व्यक्त
केले.
संभाजी माने, कोगनोळी