प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड-19 रुग्णसंख्येमध्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संशयीत, पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशन किंवा डिसीएच, डिसीएचसी, डिसीसीसी येथे रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार उपचार करणे आवश्यक असते पंरतु काही वेळा कोरोना संशयीत पॉझिटिव्ह रुग्णांना काही ठिकाणी अनधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसलेल्या रुग्णालयांमध्ये, नर्सिंग होम मध्ये दाखल करुन उपचार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. असे केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
तथापि, कोरोना संशयीत, पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यकतेनुसार होम आयसोलेशन किंवा डिसीएचसी, डिसीसीसी येथे रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार उपचार करण्याऐवजी इतरत्र, नॉन कोविड रुग्णालयांमध्ये, नर्सींग होममध्ये दाखल करुन अनधिकृतपणे उपचार केल्यास संबंधितावर कडक दंडात्मक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.