प्रतिनिधी/उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषयाला आज अर्थसंकल्पामध्येगती मिळाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतुद करण्यात आली असुन पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी ऐतिहासिकच ठरला असल्याचे मत खा. ओमराजे निंबाळकर व्यक्त केले.
या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत कठिण काळातही बिघडलेली आर्थिक घडी बसवुन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला, विद्यार्थीनी, युवक, खेळाडु, शेतकरी, मजुर, घरकाम करणाऱ्या महिला, उद्योजक, नोकरदार आदी सर्वच घटकांच्या हिताचा विचार अर्थसंकल्पामध्ये केला आहे.
तीन लाखापर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शून्य टक्के दराने कर्ज देण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात नवीन भाजीपाला रोपवाटिका स्थापन होणार असल्याने विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातुन बाजार साखळी निर्माण करण्यात येणार आहे. नाबार्डच्या सहाय्याने राज्यात नवीन गोदामं उभारणार असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल टिकुन राहण्यासाठी मदत होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









