प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरूना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस शंभरच्या पटीने वाढ होत असून आज देखील ११३ रुग्णांची त्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा ३२२९ च्या घरात गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे ३४५ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर रॅपिड अॅन्टीजन टेस्ट १०७६ घेण्यात आले होते. त्यापैकी ३३६ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ११३ पॉझिटिव्ह तर १६९ निगेटिव्ह व ५४ संदिग्ध व ९ प्रलंबित आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय पुढीलप्रमाणे उस्मानाबाद – ४५, तुळजापूर – २७, उमरगा – २१, कळंब – २४, परंडा – ३४, लोहारा – ३ भूम – १८ व वाशी – १० अशी आहे.
आज बरे होऊन घरी गेलेले १०३ रुग्ण असून ३२२९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर १५०७ बरे होऊन घरी गेले आहेत तर आजपर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








