प्रतिनिधी/उस्मानाबाद
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सध्या प्रशासकीय यंत्रणाही सध्या चांगलीच कामाला लागली आहे . प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक कोरोनाच्या बाबतीत गंभीर झालेले नाहीत हे वाढत असलेल्या रूग्णांवरून दिसून येत आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी उस्मानाबादेत 27, उमरगा येथे 25, तुळजापूर 13, कळंब 15, परंड्यात 31 , लोहारा 0, भूम 1 व वाशीत 8 असे एकूण 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या 2150 वर पोहचली असून उपचारानंतर बरे होवून घरी गेलेले रुग्ण 798 आहेत. तर 1288 रुग्ण उपचार घेत आहेत तर 64 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत 414 स्वॅबचे नमुने चाचणीसाठी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्रात पाठवीणेत आले होते. त्यानुसार 351 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 120 पॉझिटिव्ह, 225 निगेटिव्ह, 06 इनक्न्वलुजीव, 63 जणांचे अहवाल प्रलंबीत आहे. तर अॅन्टी रॅपीड टेस्ट मध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. त्यामुळे रुग्णाची संख्या 2150 वर पोहंचली आहे. सदर अहवाल शनिवार (दि. 8) दुपारी 2.30 वाजणेच्या सुमारास प्राप्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे .