प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सध्या प्रशासकीय यंत्रणाही सध्या चांगलीच कामाला लागली आहे . प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक कोरोनाच्या बाबतीत गंभीर झालेले नाहीत, हे वाढत असलेल्या रूग्णांवरून दिसून येत आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी उस्मानाबादेत 18, उमरगा येथे 27, तुळजापूर 48, कळंब 38, परंड्यात 7 , लोहारा 1, भूम 0 व वाशीत 1 असे एकूण 130 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या 2030 वर पोहंचली असून उपचारानंतर बरे होवून घरी गेलेले रुग्ण 652 आहेत. तर 1315 रुग्ण उपचार घेत आहेत तर 63 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत 355 स्वॅबचे नमुने चाचणीसाठी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्रात पाठवीणेत आले होते. त्यानुसार 318 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 130 पॉझिटिव्ह, 152 निगेटिव्ह, 36 इनक्न्वलुजीव, 37 जणांचे अहवाल प्रलंबीत आहे. तर अॅन्टी रॅपीड टेस्ट मध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. त्यामुळे रुग्णाची संख्या 2030 वर पोहोचली आहे. सदर अहवाल शुक्रवार (दि. 7) दुपारी 1.58 वाजणेच्या सुमारास प्राप्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








