जिल्ह्यात कोरोनाने शंभरी पार केली असून गुरूवारी आणखी 10 जण पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकुण रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे. उस्मानाबादेत उस्मानपुरा-सांजारोड भागात 7 नवे रुग्ण आढळून आले असून ते पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे शहरात कोरोबाधितांची संख्या वाढत आहे.
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी 74 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात होते होते. त्यापैकी 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 63 निगेटिव्ह असून 1 संदिग्ध आहे. उस्मानाबादेत उस्मानपुरा नगर भागात आणखी 7 कोरोनाबाधित आढळून आले असून ते पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. 2 रुग्ण कळंब तालुक्यातील शिराढोण येथील असून 1 रुग्ण भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथील एकाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती दहा दिवसांपूर्वी घाटकोपर (मुंबई) येथून आलेली होती.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता शंभरीपार म्हणजेच 104 वर पोहचली असून तिघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या 60 जणांवर उपचार सुरू असून 41 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.








