शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
उस्मानाबाद /प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुण वाढत आहेत. त्यामुळे प्रथम उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता नंतर परंडा येथे एक रुग्ण सापडल्याने अरेंज झोनमध्ये गेला आता जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १3 झाली असल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा हा आता रेड झोनकडे वाटचाल करीत आहे. कोरोना बाधित व्यक्ती आढळल्याने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी दिल्याने पोलिस प्रशासनाने शहरातील सर्व दुकाने बंद केली आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 19 रोजी एकुण 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील आहे व दुसरी व्यक्ती लातूर तालुक्यातील बोरगाव येथील आहे. दोघेही 3 दिवसापूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन, त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह व 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हाते. त्यापैकी सर्वच 6 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जळकोट येथील 10 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले असुन त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे. लातुर जिल्हयातील असे एकुण 67 स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 4 पॉझिटीव्ह असुन 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) व एका व्यक्तीचा स्वॅब Reject करण्यात आला आहे.
तसेच बीड जिल्हयातील 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहे. तर 3 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 6.व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत . तर एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
Previous Articleचिखलीतील स्क्वॉश कोर्टचे काम पूर्णत्वाकडे
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बधितांचे शतक








