प्रतिनिधी / उस्मानाबाद
कळंब शहरातून जाणाऱ्या मांजरा नदीच्या पुलाजवळ सोमवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळा आहे. नदीत मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सायंकाळच्या वेळेला मोठ्या पुलाजवळ मृतदेह तरंगताना काहींना दिसला.बघणाऱ्यांनी लागलीच कळंब पोलिसांना याबाबत माहिती दिली. कळंब पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
अंदाजे 35 वय असलेल्या व्यक्तीचे हे मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची देखील माहिती मिळतीये. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला आहे. त्यामुळे मृतदेह ओळख अद्याप पटलेली नाही.
मृतदेह नेमका कोणाचा आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहे. नजीकच्या सर्व पोलीस ठाणे आणि तेथील अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीत व परिसरात शोध घेऊन सदर प्रेताची ओळख पटवण्यास मदत करावी, असे आवाहन कळंब पोलिसांनी केले आहे.









