प्रतिनिधी / सातारा :
उसाने भरलेल्या बैलगाडीचे चाक पोटावरुन गेल्याने ऊस तोड कामगाराच्या 8 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिंगणगाव (ता. फलटण) येथे ही घटना घडली.
लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंगणगाव येथे सुनील उत्तम काकडे यांच्या शेतात ऊस तोड सुरु आहे. शेतातून उसाची भरलेली बैलगाडी बाहेर काढत असताना आदित्य मच्छिंद्र चव्हाण (वय 8, मुळ रा. तळेगाव तांडा) हा उसाने भरलेल्या बैलगाडीखाली आला. त्याच्या पोटावरुन बैलगाडीचे चाक गेल्याने तो जखमी झाल्याने त्याचे वडिल मच्छिंद्र यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार होले हे तपास करत आहेत.









