शाहुवाडी / प्रतिनिधी
शेतात उसाचा पाला पेटवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील सवते येथे आज ही घटना घडली. नावजी दादू पाटील वय ९० असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नावजी पाटील हे आपल्या खोकड नावाच्या शेतातील पाला पेटविण्यासाठी सकाळी गेले होते. दिवसभर ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता ते सापडले नाहीत. दरम्यान सायंकाळच्या वेळी पोलीस पाटील निवास कांबळे यांना ते दिसले. परंतु, त्यावेळी आगीत जळून त्यांचा मृत्यू झाला होता. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची शाहूवाडी पोलिसात नोंद झाली आहे.
Previous Article`इंद्रा सहानी’तील निकालाचा पुनर्विचार व्हावा
Next Article जागतिक चिमणी दिन; मनुष्यामुळेच हरवतोय चिवचिवाट









