दोडामार्ग / वार्ताहर:
उसप गावातील जंगलात तीन अस्वले पहावयास मिळाली असून परिसरात कुतूहलासोबत भीतीचेही वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर कळणेकर हा युवक शेतीकामानिमित्त आपल्या शेती बागायतीमध्ये आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गेला होता. शेतात कामकाज करत असताना त्याला ही तीन अस्वले पहावयास दृष्टीस पडली. त्याने लागलीच आपल्या जवळील मोबाईल मध्ये ही तीन अस्वले कैद केली. या अस्वलांचा विडिओ उसप गाव परिसरासहित तालुक्यात व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. वनविभागाने या अस्वलांचा शोध घेऊन त्यांच्या अस्तित्वा बाबत भूमिका व्यक्त करण्याची मागणी होते आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









