वार्ताहर / उसगांव
उसगांव येथील वडाच्या झाडाखाली गेल्या 16 दिवसापासून बेवारस स्थितीत दुचाकी पार्क करून ठेवण्यात आली आहे.
डिचोली येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयात नोंद असलेली जीए 04 एन 1236 या क्रमांकाची काळय़ा रंगाची ही एविएटर दुचाकी 16 दिवसापासून या ठिकाणी उभी करुन ठेवण्यात आली. तसेच त्याच वडाखाली गेल्या पाच दिवसांपासून रेंट अ बाईक हिरो होंडा मोटरसायकल बेवारस स्थितीत पार्क करून ठेवण्यात आली होती. दुचाकी मालकाला सुगावा लागताच त्यांनी गुरुवारी सायंकाळी ही दुचाकी आपल्या ताब्यात घेतली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.









