श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचा पुढाकार
ओटवणे / प्रतिनिधी:
सावंतवाडी कंझ्युमर्स को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी कोरोना काळात गेले दिड वर्ष स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याहस्ते उमाकांत वारंग यांना कोरोना देवदूत पुरस्काराने गौरविण्यात आले. कोरोना संकटकाळात उमाकांत वारंग यांनी गोरगरीब जनता व रुग्ण यांच्यासाठी अनेक उपक्रम राबविले. यात रुग्णांची गाडीने ने आण करणे, गरजूंना अन्नदान आदी समाजोपयोगी उपक्रमांचा सहभाग होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने गौरविण्यात आले.
यावेळी सावंतवाडीचे पूर्व प्रांताधिकारी तथा रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी उमाकांत वारंग यांच्या हस्ते जनतेची सेवा यापुढेही अशीच व्हावी असे गौरवोद्गार काढले. यावेळी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









