अचानक भजन मंडळ द्वितीय, बाल महिला वारकरी भजन मंडळ नवाबाग तृतीय
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
केपादेवी वारकरी भजन मंडळ मुठवाडी उभादांडातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत श्री महापुरुष वारकरी संप्रदाय भजन मंडळ निवती-कोचरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
केपादेवी वारकरी भजन मंडळ मुठवाडी उभादांडा आयोजित जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धा केपादेवी मंदिरात नुकतीच झाली. या स्पर्धेत जिल्हय़ातील अनेक भजनी मंडळ सहभागी झाले होते. यामध्ये द्वितीय क्रमांक अचानक भजन मंडळ वेंगुर्ले यांनी व तृतीय क्रमांक बाल महिला वारकरी भजन मंडळ नवाबाग यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ ह. भ. प. वारकरी भजन मंडळ सोन्सुरे यांनी पटकाविला.
उत्कृष्ट गायक म्हणून वरचेमाडवाडी येथील संदेश आकलेकर, उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून वेंगुर्ले अचानक भजन मंडळातील प्रसाद गुरव, उत्कृष्ट नृत्य अविष्कार म्हणून 15 वर्षाखालील प्रीतेश सोन्सुरकर व लक्षवेधी भजन मंडळ म्हणून श्री महापुरुष वारकरी भजन मंडळ निवती-कोचरा यांना बक्षीस देण्यात आले.
यावेळी केपादेवी वारकरी भजन मंडळाचे बुवा गणंजय सावंत यांची वेंगुर्ले तालुका वारकरी भजन मंडळाचे युवा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा ह. भ. प. पंढरीनाथ सावंत व पखवाज विषारद हेमंत तवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण पंढरीनाथ सावंत व हेमंत तवटे यांनी केले. तर सूत्रसंचलन राजा सामंत यांनी केले.









