10 किमी साठी 169 रुपये भाडे : मुंबईत सेवा उपलब्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
उबर या स्टार्टअपची आतापर्यंत
ऍपवर आधारीत असणारी टॅक्सी सेवा अशीच ओळख होती. परंतु सध्या उबरने ऑटो रेंटल सेवा देशात सुरु केली आहे. यामध्ये प्रवाशांना मुंबईमध्ये 169 रुपयांमध्ये एका तासाला 10 किलोमीटरचा प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच अशी सेवा देणारी ही पहिलीच कंपनी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. परंतु याआधी ओला कंपनी ऑटो सेवा देत आलेली आहे.
सदरची सेवा ही आठवडय़ातील सात दिवस चोवीस तास उपलब्ध होणार असून प्रवाशांना काही तासाकरीता आरक्षण करुन अखंडपणे या सेवेचा लाभ घेण्याची सुविधा असल्याचे उबरने स्पष्ट केले आहे. उबरकडून ही सेवा सध्या मुंबईत सुरु करण्यात आली आहे. यासोबत बेंगळूर, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे आदी ठिकाणीही ही सेवा सुरु राहील.
सुरक्षेवर भर सुरक्षेमध्ये ऑनलाईन चेकलिस्ट, मास्क वापर आवश्यक असून प्रवासाअगोदर चालकाचा मास्क असल्याचा सेल्फी घेऊन खात्री करणे आवश्यक असेल. प्रशिक्षित चालक देण्यासोबत अन्यप्रकारे प्रवाशांची सुरक्षा घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उबरने स्पष्ट केले आहे.









