सांगरुळ / प्रतिनिधी
उपवडे (ता करवीर )येथे जोरात झालेल्या पावसामुळे शेततळे फुटले.यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पिकांसह सहा हेक्टर पीकाऊ शेतजमिनी सह वनखात्याचे जमीनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पिकाऊ जमीन दगड गाळाने भरली आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत. तसेच मठाचा धनगर वाडा येथे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान शेततळ्याची ग्रामपंचायत मध्ये नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
ग्रामस्थ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ऊपवडे पैकी मठाचा धनगर वाडा येथे बावीस वर्षांपूर्वी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेतून शेततळे बांधण्यात आले. या शेततळ्यामुळे मठाचा धनगर वाडा येथील जनावरांचा व काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता . गेल्या आठवड्यात या डोंगरी भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेततळे रात्रीच्या वेळी फुटले.मोठे शेततळे असल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहून जाताना, वनखात्याच्या जमिनीचे, झाडांचे नुकसान झाले. तसेच शेतकरी,गंगाराम जानकर, विठोबा जानकर, बाबू बोडके,सोनबा बोडके या धनगर वाड्यावरील शेतकऱ्यांचे सुमारे आठ ते दहा एकर पिकाऊ जमीनीचे पिकासह नुकसान झाले. उपवडे येथील रघुनाथ दळवी, आप्पाजी दळवी, लहू दळवी, शिवाजी दळवी, मारुती दळवी, भाऊ दळवी व अन्य शेतकऱ्यांचे भात पिकाचे व इतर पिकांचे नुकसान झाले . ओढ्याच्या काठावरील पिकाची जमीन गाळ व दगड धोंड्यांनी भरली आहे. दोन शेतकऱ्यांच्या विहिरी व डिझेल इंजिन बुजून गेले.
करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी,सरपंच सुरेश आरडे, उपसरपंच रंगराव पाटील ,सर्कल सुहास घोदे, तलाठी, कोतवाल सचिन पोवार, कृषी सहाय्यक केदार माळी व शेतकरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









