बिलाची होळी करताना पोलिसांनी रोखले, मनपा उपायुक्त, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / मिरज
कचरा, घनकचरा प्रकल्पाचे कर म्हणून महापालिकेने आकारलेला उपयोगकर्ता कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने महापालिका मिरज विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी उपयोगकर्ता कर बिले फाडण्यात आली. उपयोगकर्ता बिलाची होळी करताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. आंदोलनकर्ते कराविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका कार्यालयात शिरले. मागण्यांचे निवेदन उपायुक्त स्मृती पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आले.








