प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा परिषदचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर रत्नागिरीहून बदली होऊन अर्चना वाघमळे या आल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला. त्यांचे स्वागत जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केले. यावेळी शिक्षण व अर्थ समितीच सभापती मानसिंगराव जगदाळे हेही उपस्थित होते.
जिल्ह्यात आले गटविकास अधिकारी
जिल्ह्यात बदलून गेलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त होत्या. तेथे गटविकास अधिकारी नियुक्त करण्यात आले. खटावचे रमेश काळे यांची जावली येथे बदली तर वाळवाचे शशिकांत शिंदे यांची कराडला आणि महाबळेश्वरचे नारायण घोपल यांची वाईला बदली झाली. रत्नागिरीचे प्रकल्प संचालक अरुण मरगळ यांची महाबळेश्वरला बदली झाली आहे.









