बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्या कुटुंबातील आठ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपमुख्यमंत्री कारजोळ त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी आठ सदस्यांमध्ये त्यांचा मुलगा डॉ. गोपाल कारजोळ यांचा समावेश आहे. गेल्या २३ दिवसांपासून गोपाळ व्हेंटिलेटरवर आहे. घरातील सदस्य कोरोना बाधित असल्याने ते पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात जाऊ शकत नाही असे त्यांनी म्हंटले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये माझा मुलगा डॉ. गोपाल करजोल गेल्या २३ दिवसांपासून कोरोना संक्रमित असल्यामुळे तो व्हेंटिलेटरवर आहेत. तर माझी पत्नी कोरोनातून मुक्त झाल्याने ती रुग्णालयातून घरी परतली आहे. मी स्वतः १९ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर कोरोनामुक्त झालो आहे. एकूणच, माझ्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कारजोळ हे बागलकोट आणि गुलबर्गा जिल्ह्यांचे प्रभारी मंत्री आहेत. ते बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील भाजपचे आमदार आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.









