मराठा आरक्षण या मुद्द्यावरून सुमारे पाऊण तास सखोल चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना रुग्णसंख्येमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 13.55 असून मृत्यूदर 3.2 टक्के आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.
सकाळी ठीक नऊ वाजता अजित पवारांनी न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू महाराज आणि युवराज मालोजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण या मुद्द्यावरून सुमारे पाऊण तास सखोल चर्चा झाली. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात प्रशासनासोबत कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









