कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या मालमत्तांवरही आयकर विभागने धाडी मारल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ अजित पवारांच्या नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कोल्हापुरात राहणाऱ्या अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
विजया पाटील अजित पवारांची बहीण असून त्या कोल्हापुरात राहतात. आज आयकर विभागाने पवारांच्या बहिणीच्या मालमत्तांवर धाडी मारल्या या मध्ये विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयावर छापा टाकला असून चौकशी केली जात आहे.









