गोडोली / प्रतिनिधी :
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आज (दि.७) शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व कामकाज बंद असणार आहे. या दिवशी वाहन नोंदणी ,परवाना, प्रमाणपत्र, अनुद्यप्ती कामकाज, शिबिर कामकाज
व अन्य कामासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्या आहेत. त्या सर्व रद्द झाल्या असून सर्व अपॉइंटमेंट धारकांच्या मोबाईलवर कार्यालयाकडून नव्याने अपॉइंटमेंटबाबत पुनर्नियोजन दिवस मेसेजद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना दिली.









