बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
उपनोंदणी अधिकाऱयांनी प्रभारी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मात्र, ते कोणतेच काम करण्यास तयार नाहीत. ते वकिलांबरोबर गैरवर्तन करत आहेत. याचबरोबर नाहक त्रास देत आहेत. खरेदी-विक्रीच्यावेळी अशाप्रकारे नाहक त्रास देत असून तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्यांना त्या ठिकाणी काम करता येत नाही. कोणत्याही प्रकारची कागदपत्रे हाताळण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नाही. केवळ ती कागदपत्रे पाहण्यासाठीच अर्धा तास त्यांना लागत आहे. बोजा चढविताना कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहितीदेखील त्यांना नाही. खरेदी-विक्री करतानाही त्यांच्याकडून योग्यप्रकारे मार्गदर्शन होत नाही. तेव्हा तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी आणि येथील कारभार सुधारावा, अशी मागणी वकिलांनी निवेदनामध्ये केली आहे.
या कार्यालयामध्ये एजंटांचा सुळसुळाट सुरू आहे. गणेश नामक व्यक्ती या ठिकाणी कार्यरत असून तेथील एजंटराज संपवावे, असे निवेदनात म्हटले आहे. गणेश हा बॉन्ड रायटर आहे. तेव्हा या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. बेळगावचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज 120 हून अधिक खरेदी-विक्री व्यवहार होत असतात. पैशाची मागणीदेखील करण्यात येत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या कार्यालयामधील संगणक व्यवस्था जुनी आहे. ती बदलून नवीन आधुनिक व्यवस्था करावी. जेणेकरून सर्व काम वेळेत व सुरळीत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. महसूल मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, बेळगाव प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हा नोंदणी अधिकाऱयांच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ज्ये÷ वकील डी. एम. पाटील, ऍड. जोतिबा पाटील, ऍड. आर. जे. भाई, ऍड. नामदेव मोरे, ऍड. श्रीधर मुतगेकर, ऍड. सचिन शिवण्णावर, ऍड. सनदी यांच्यासह वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









