प्रतिनिधी/ सातारा
काल बिनविरोध निवड झालेले उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सकाळी केबिनमध्ये हजेरी लावताच पालिका कर्मचाऱयांसह शहरातील नागरिकांची दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी वर्दळ सुरू होती. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना फोनवरून शुभेच्छा येत होत्या. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, हद्दवाढ झालेल्या भागासह सर्व सातरकरांना सुविधा देण्यासाठी खासदार उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वी मनोज शेंडे यांनी कोरोनाच्या काळात सातारा शहरवासीयांना सेवा देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शहरात आलेल्या नव्याने उपनगरांना ही सुविधा देण्यासाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळपासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. कोणी प्रत्यक्ष भेटून तर कोणी फोनवरून शुभेच्छा दिल्या.








