सावंतवाडी /प्रतिनिधी –
सुधा श्रीरंग आचार्य वय 75 राहणार हळदीपूर तालुका होन्नावर यांचे शनिवारी 12 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. वैश्य समाजाचे हळदीपूर येथील गुरू मठाचे प्रधान अर्चक श्रीरंग आचार्य यांच्या त्या पत्नी होत तर सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या त्या आई आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोरगावकर यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात नवरा मुलगा मुली सुना नातवंडे असा परिवार आहे









