मैत्रिणींनो, ऋ तू कोणताही असला तरी स्टाईलच्या बाबतीत कोणतीही तडजोड करून चालत नाही. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधल्या कपडय़ांना वेगळ्या पद्धतीने कॅरी करू शकता. ऍक्सेसरीजचाही कुशलतेने वापर करू शकता. उन्हाळ्यात कूल दिसण्यासाठी नेमकं काय करता येईल? जाणून घेऊ.
- तुम्ही ऍक्सेसरीजना हटके टच देऊ शकता. जान्हवी कपूरने कॅज्युअल व्हाईट ओव्हरसाईज्ड टी शर्ट आणि क्रॉप्ड जीन्स घातली होती. आपला लूक खुलवण्यासाठी तिने नेकपीसचं लेअरिंग केलं होतं. तुम्हालाही कॅज्युअल प्रसंगी इतरांपेक्षा उठून दिसायचं असेल तर अशा पद्धतीने नेकपीसचं लेअरिंग करता येईल. तुम्ही स्टेटमेंट ऍक्सेसरीजही घालू शकता.
- या दिवसात मोनोक्रोम लूकही कॅरी करता येईल. दीपिका पदुकोणने फिकट हिरव्या रंगाचा टॉप आणि गडद हिरवी पँट असा लूक केला होता. तुम्हीही एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा ट्राय करू शकता किंवा एकाच प्रकारचं प्रिंट कॅरी करू शकता.
- उन्हाळ्यातही लेअरिंग करता येतं. याआधी आलिया भट्टकडून टिप्स घेता येतील. आलियाने पांढरा टी शर्ट आणि डेनिम जीन्सवर पोलका डॉट केप घातला होता. तुम्हीही लेअरिंगसाठी श्रग्ज, डेनिम जॅकेट्सचा वापर करू शकता.
- तुम्ही स्लीव्हलेस टॉपसोबत कूलेट्स घालू शकता. हटके लूकसाठी लाँग श्रग किंवा जॅकटही घालता येईल. अशा पद्धतीने उन्हाळ्यातही स्टायलिश दिसता येईल.









