प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सध्या उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, या सामाजिक हेतूने फेसबुक प्रेंड्स सर्कलने नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एक्स्पर्ट इंजिनियरिंगचे व्यवस्थापकीय संचालक विनायक लोकूर व संतोष ममदापूर यांनी दोन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे फेसबुक प्रेंड्स सर्कलने ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. उद्योजक विनायक लोकूर व संतोष ममदापूर यांनी सामाजिक हेतूने फेसबुक प्रेंड्स सर्कलला दोन ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.









